उसने-हसणे
-----------------------------------------------------------------------
पावसाळा/वर्षा / बारिश
---------------------------------------------
१) पोचलेली आसामी
एका माणसाची बायको भयंकर कजाग होती. सारखी सगळ्यांशी भांडायची. माणूस अगदी त्रस्त झाला होता. काही काळाने त्या बायकोला एक दुर्धर रोग झाला व त्यात ती मेली. ( नवर्यांनो देवाकडे असे काही मागू नका, असे फक्त जोकमध्येच होते !). रीतीप्रमाणे सर्व संस्कार त्या माणसाने केले. स्मशानात त्याने चितेला आग लावली अन् प्रचंड गडगडाट झाला, वीजा चमकू लागल्या व धो धो पाऊस पडू लागला. माणसाने किंचित वर पाहिले व म्हणाला : "इतक्यात पोचली वाटतं, वर !"
---------------------------------------------------------------------------------------------------
२) एक वैज्ञानिक प्रश्न
खूप वर्षांपूर्वी दादर चौपाटी व बांद्रा चौपाटी येथे पोलीस बॅंड पथक रोज संध्याकाळी छान बॅंड वाजवीत असत. त्यांच्यासाठी एक गोल चबुतरा बांधलेला असे, ज्याला बॅंड-स्टॅंड असे म्हणत. जसे बांद्रा-बॅंड-स्टॅंड . ह्या पथकात, क्लॅरिओनेट, बासरी, ब्रासचे भोंगे, ड्रम वगैरे असून त्यांना मार्गदर्शन करणारा एक कंडक्टरही असे. एकदा पावसाळयाच्या दिवसात संध्याकाळी ते बॅंड वाजवत असताना अचानक जोराचा पाऊस आला, ढगांचा गडगडाट, झाला व विजाही चमकू लागल्या. आता समजा वीज तिथे पडलीच तर ती कोणावर पडेल ?
वैज्ञानिक उत्तर : वीज नेहमी कंडक्टरवरच पडते. ( कंडक्टर म्हणजे वीज-वाहक पदार्थ )
--------------------------------------------------------------------------------------------------
३) आत खेळा बरे !
मदर कांगारू म्हणजे आई-कांगारूंना पाऊस अजिबात आवडत नाही. का बरे ?
उत्तर : मग मुले आत खेळतात ना !
------------------------------------------------------------------------------------------------
४) स्लोकेन
पावसाळयात साधारणत: वारे वादळही वाहू लागतात. आपण ज्याला वादळ म्हणतो त्याला इंग्रजीत हरिकेन असे म्हणतात. हरिकेन मध्ये हवा खूपच फास्ट वाहात असते. ती जरा स्लो का वाहात नाही बरे ?
उत्तर : हरिकेन मधली हवा स्लो वाहिली तर मग ते लोक त्याला स्लोकेन म्हणाले असते ना !
--------------------------------------------------------------------------------------------------
५) चेंज हवी, चेंज हवी
एका बस-कंडक्टरची बायको खूप मदत करणारी होती. त्याला वेळच्या वेळी डबा, युनिफॉर्म वगैरे तर द्यायचीच शिवाय मदत म्हणून चिल्लरही गोळा करून त्याला मदत करायची. एकदा पावसाळ्यात एकसारखा दोन तीन दिवस पाऊस पडत होता. सगळे घरीच वैतागून थांबले होते. पण कंडक्टरची बायको एवढ्या पावसात पर्स घेऊन निघाली. दारापासून परत आली, पर्सची चेन उघडली व उघडी पर्स घेऊन पावसात भिजत निघाली. का बरे असे ?
उत्तर : अहो तिला वेदर मध्ये चेंज पाहिजे होता !
---------------------------------------------------------------------------------------------------
६) रेन कार्यशाळा
एकदा पावसावर, म्हणजे रेन वर, अमेरिकेत एक कार्यशाळा भरविण्यात आली होती. देशोदेशीचे तज्ज्ञ त्यासाठी गेले होते. मुंबई महानगरपालीकेचा एक इंजिनिअरही त्याला गेला होता. परत आल्यावर तिथे काय शिकवले ते सांगण्यासाठी त्याचे एक भाषण ठेवण्यात आले होते. तो सांगू लागला : फॉरेन का रेन और इंडिया का रेन मे भौत फरक है । फॉरेन मे जब रेन पांच मिनिट के लिये भी रुकता है तो स्टॉर्म-वाटर-ड्रेन और स्लोप के वजह से पूरा पानी गायब होता है ।
तेव्हढ्यात प्रेक्षकातला एक नागरिक उभा राहून सांगू लागला : और इंडिया का रेन के बाद पांच मिनिट में पूरा रोड गायब होता है ।
-----------------------------------------------------------------------------------------------------
७) सीनीयर्सचा प्रॉब्लेम
सीनीयर सिटिझन्स पावसाळ्यात अगदी जय्यत तयारीने बागेत येतात. ओल्या बाकावर पॅंट ओली होऊ नये म्हणून प्लॅस्टिकची घडी करून आणलेली पिशवी, व पाऊस पडलाच तर मोठ्ठी छत्री ! पण एक सिनीयर सिटीझन इतके सीनीयर होते की थोडासा झिरझिर पाऊस सुरू झाला की छत्री उघडून आरामात डुलकी घेत बसत. मग शेजारचा त्यांना सांगे : अंकल बारिश बंद हुआ है, छाता बंद कर सकते हो !. त्यांना मग खूपच खजील वाटायला होई. मग त्यावर त्यांनी एक युक्ती काढली. छत्रीला एक मोठे भोक केले . कशाला ? अहो, पाऊस थांबला की नाही ते आता त्यांना त्यातून दिसेल ना !
-----------------------------------------------------------------------------------------------------
८) पैसे का सुखाना
स्टेट बॅंकेतल्या एका कॅशीअरची एकदा बदली झाली. त्याला खूप अनुभव असल्याने प्रमोशनवर त्याला थेट अमेरिकेत वाशिंग्टन येथे पाठवण्यात आले. तो खुषीतच तिथे पोचला. काही दिवस झाले. आणि वाशिंग्टन मध्ये जोरदार पाऊस झाला. आपल्याकडच्यासारखेच रस्तोरस्ती फ्लडिंग झाले. बॅंकेचे तळघरातले लॉकर्सही बुडाले. नंतर इन्स्पेक्शन केले त्यात सगळे पैसे भिजल्याचे आढळून आले. आता भिजलेल्या पैशांचे करायचे काय ? ते लोक त्याला विचारू लागले की तुम्हाला तर दांडगा अनुभव असेल. तुम्हीच सांगा काय करायचे ? तो आत्मविश्वासाने सांगू लागला : मुंबईत ना असाच एका २६ जुलैला आमची बॅंकही डुबली होती. आमचे पैसेही भिजले होते. मग आम्ही ते पंख्याखाली पसरले, लवकर वाळावेत म्हणून मोठे मोठे बल्बही लावले. झाले दोन दिवसात सगळ्या नोटा कोरड्या झाल्या. झाले त्याच्या सल्ल्यानुसार अमेरिकननांनी भिजलेले पैसे पंख्याखाली वाळवायला ठेवले, एकदोन हीटरही लावले. पण पैसे काही सुकेचनात. कॅशियर चक्रावला. त्याने आपल्या गुरूला मुंबईला फोन लावला. त्यावर डॉलरच्या नोटा का सुकत नाहीत त्याचे विवेचन गुरू करू लागला : अपना महात्मा गांधी है ना, शर्टबिर्ट कुछ डालता नही था, सिर्फ एक पतली धोती थी. जल्दी सुख जाती है । इनके डॉलर के उप्परका बेंजामिन साला शर्ट, टाय, थ्री-पीस सूट ऐसा डालेला होगा तो इतने जल्दी कैसे सुकेगा ? ड्रायर ट्राय करो !
--------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा