-----------------------------------------------------------------------------------------------
बुढ्ढे जोक्स :
१) एक बुढ्ढा बुढढी असतात. त्यांच्यात आता भांडण करण्यासारखे काही राहिलेले नसते. सगळे वादविवाद ते अगदी प्रांजळपणे सोडवीत असतात. एकदा बुढ्ढी म्हणते की तुम्ही असं करा, मी जर तुमच्या आधी गेले तर खुशाल लगेचच दुसरे लग्न करा. अजिबात थांबू नका. फक्त एक करा की माझ्या साड्या मी इतक्या काळजीने ठेवल्या आहेत, त्या मात्र त्या सटवीला देऊ नका. कोणत्याही स्त्रियांच्या संस्थेला दान करा पण तिला मात्र देऊ नका. त्यावर बुढढा लगेच म्हणतो, "अगं, नाही तरी माधुरी, जीन्स टॉप्सच घालते, साड्या नाही नेसत !"
२) क्लबात व्हॅलेंटाईन डे ची पार्टी असते. सगळे तरुण पार्टीला असतातच. पण ते बुढढ्यालाही पार्टीला येण्यासाठी आग्रह करतात. तो म्हणतो खूप, की अरे आता ह्या वयात मी येऊन काय करणार. व्हॅलेंटाईन कुठे शोधणार ? त्यावर यंग हितेश म्हणतो, अंकल, मी तुम्हाला मदत करीन. तुमच्यासाठी एक मस्त व्हॅलेंटाईन शोधीन व तिला पटवूनही ठेवीन. तुम्ही फक्त पार्टीला यायचं व तिचा ताबा घ्यायचा. झालं ! बुढढा तयार होतो. ठरल्याप्रमाणं पार्टीत पोचतो. पाहतो तर काय तिथे एका पेक्षा एक मादक व्हॅलेंटाईन नटून थटून आलेल्या असतात. आता बुढढा त्यात आपली व्हॅलेंटाईन शोधू लागतो. ठरलेले असते की हितेश जिला ठरवून आणणार तिच्या ब्लाऊज मागे "V" असे लेबल स्टिक करणार. बुढ्ढ्याची नजर "V" शोधत असते. तो त्यातल्या त्यात एका "डर्टी"--बालन ला निवडतो व "ए मेरी व्हॅलेंटाईन" असे म्हणून फुले देणार, इतक्यात हितेश येऊन म्हणतो, अंकल, ये नही, उसके पीछे मैने "V" लेबल लगाया है. बुढढा म्हणतो, अरे, ऐसा क्या, सॉरी हं, मै आगेका "V" देख रहा था !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा