जोक्स करणे, खायचे काम नाही-१
------------------------------
१) एक असतो कांदा. एका वर्षी पावसाची गडबड झाल्याने कांद्याचा भाव खूपच वाढतो. मग तो भलताच भाव खावू लागतो. तो म्हणायला लागतो एवढ्या पैशात तर आता मी लग्नच करतो. बटाटा त्याला चिडवत विचारतो की कोणाशी करणार लग्न ? त्यावेळेस पत्ता-कोबीचा भाव फारच चढा असतो, तरी कांदा म्हणतो मी कोबीशीच लग्न करतो. कांद्याच्या हट्टापुढे सगळे नमतात. त्याचे कोबीशी लग्नही होते. मग रीतसर ते हनीमूनला जातात. हनीमूनहून परत आल्यावर इतर भाज्या त्या कांद्याला विचारू लागतात, कसा राह्यला हनीमून.? कांदा जरा लाजत म्हणतो, "तसे तर सगळे ठीकच झाले, फक्त सुहाग रात माझे आणि कोबीचे एकेक पदर खोलण्यातच संपली !"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा