गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३






१) सीनीयर्स के प्रॉब्लेम्स :
लहानपणी भांडणात मित्र एकमेकांचे केस ओढायचे तेव्हा मागितले होते, "देवा, माझे केसच जाऊ दे"....तर देवाने आत्ता केसच ठेवले नाहीत!

बायको सारखी वटवट करते. तिचे बोलणे बंद कर असे देवाकडे मागितले, तर देवाने आता माझे कानच नेले !

हनीमून मध्ये मागितले होते की देवा असे बार बार होऊ दे....तर आताशी आधी बार मध्ये जावे लागते तेव्हाच....

जवानीत डोळा मारण्याचे एवढे सुख वाटे की देवा परमनंट एक डोळा मिटव असे म्हटले आणि हे काय आता एका डोळ्याला कॅटरॅक्ट की हो आले !

"कोवळी काकडी" पाहिली तेव्हा वाटायचे "कच्चा चबा जाऊ" असे दात दे देवा....आणि आता हाती आली कवळी !

लग्नाच्या सुखासाठी देवाकडे मागितला परमनंट स्टिफनेस ! आणि गुडघे, मान, पाठ असा भलतीकडेच आला आहे आज स्टिफनेस !

-----------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा