गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१३






१) सीनीयर्स के प्रॉब्लेम्स :
लहानपणी भांडणात मित्र एकमेकांचे केस ओढायचे तेव्हा मागितले होते, "देवा, माझे केसच जाऊ दे"....तर देवाने आत्ता केसच ठेवले नाहीत!

बायको सारखी वटवट करते. तिचे बोलणे बंद कर असे देवाकडे मागितले, तर देवाने आता माझे कानच नेले !

हनीमून मध्ये मागितले होते की देवा असे बार बार होऊ दे....तर आताशी आधी बार मध्ये जावे लागते तेव्हाच....

जवानीत डोळा मारण्याचे एवढे सुख वाटे की देवा परमनंट एक डोळा मिटव असे म्हटले आणि हे काय आता एका डोळ्याला कॅटरॅक्ट की हो आले !

"कोवळी काकडी" पाहिली तेव्हा वाटायचे "कच्चा चबा जाऊ" असे दात दे देवा....आणि आता हाती आली कवळी !

लग्नाच्या सुखासाठी देवाकडे मागितला परमनंट स्टिफनेस ! आणि गुडघे, मान, पाठ असा भलतीकडेच आला आहे आज स्टिफनेस !

-----------------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३




जोक्स करणे खायचे काम....२

 एकदा एक सरदारजी मराठी माणसाशी भांडायला लागतो. तो त्याला म्हणतो तू करून करून काय करशील ? त्यावर मराठी माणूस पंजाब्याला, सरदारला म्हणतो : काही नाही, मी तुला वरून पनीर खाऊ घालील आणि खालून लस्सी निघेल ! 
( सौजन्य: जय महाराष्ट्र ढाबा, बठींडा )

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३






जोक्स करणे, खायचे काम नाही-१
------------------------------
१) एक असतो कांदा. एका वर्षी पावसाची गडबड झाल्याने कांद्याचा भाव खूपच वाढतो. मग तो भलताच भाव खावू लागतो. तो म्हणायला लागतो एवढ्या पैशात तर आता मी लग्नच करतो. बटाटा त्याला चिडवत विचारतो की कोणाशी करणार लग्न ? त्यावेळेस पत्ता-कोबीचा भाव फारच चढा असतो, तरी कांदा म्हणतो मी कोबीशीच लग्न करतो. कांद्याच्या हट्टापुढे सगळे नमतात. त्याचे कोबीशी लग्नही होते. मग रीतसर ते हनीमूनला जातात. हनीमूनहून परत आल्यावर इतर भाज्या त्या कांद्याला विचारू लागतात, कसा राह्यला हनीमून.? कांदा जरा लाजत म्हणतो, "तसे तर सगळे ठीकच झाले, फक्त सुहाग रात माझे आणि कोबीचे एकेक पदर खोलण्यातच संपली !"