सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

जयरामांचा मोबाईल आणि संडास
एकदा जयराम नवीन मंत्रालयाचा ( ग्रामीण विकास ) कारभार प्रत्यक्ष बघण्यासाठी एका खेड्यात जातात, तर त्यांना तिथे लोक शेतात उघड्यावर शी करताना दिसतात. आता तुम्हाला वाटेल, त्यात काय एवढेसे. आपणही कालपरवा पावेतो असेच उघड्यावर करत होतो की. अगदी मुंबईतही. तर जयरामांचे निरिक्षण मोठे मार्मिक. ते म्हणतात ह्यांच्या हातात एवढा स्मार्ट मोबाईल फोन आहे पण शी S ! मात्र उघड्यावर ?
जयराम जेव्हा शेतातून शीला बसलेल्याच्या शेजारून जात होते तेव्हा धोंडूच्या हातातल्या आयफोनने खां खां असा खोकण्याचा आवाज काढला. आयफोनवरचे हे ऍप, ऍपलने नुकतेच खास ग्रामीण जनतेसाठी काढले आहे. त्याचे काय आहे की कित्येक वेळा हे शेतात शी करत असताना शिळोप्याच्या गप्पा मारत असतात किंवा काही वाचत असतात किंवा काही, ढिंक चिका-ढिंक चिका असे ऐकत असतात. नेमके त्याच वेळेस कोणी शेजारून जात असेल तर किती अवघड प्रसंग ना ? म्हणजे शेजारून जाणार्‍याला हो ! तर ह्या नवीन ऍप मध्ये कोणी तीन फुटावर आले की सेंसर ते ओळखतो व मग मोबाईल खास असे आवाज काढतो. जसे: खां खां असा खोकण्याचा किंवा हां S असा कण्हण्याचा ! तुम्ही आवाजाची पाहिजे तशी ट्यून सिलेक्ट करू शकता. बदलूही शकता.
जयरामांना विश्वासच बसेना. त्यांनी धोंडूला सांगितले की तुझे आटपल्यावर मला जरा नवीन ऍप्स दाखवशील का ? धोतरालाचा हात पुसत धोंडू त्याचा लेटेस्ट फोर-एस सेट जयरामांना दाखवू लागला. तो म्हणे, "साहेब ह्यात जीपीएस घातले आहे." जयराम म्हणू लागले की शेतात काय करायचेय जीपीएस ? इथे सगळेच उजाड आहे. तर धोंडू नवीन तंत्रज्ञान त्यांना समजावून देऊ लागला. तो म्हणे "हे पहा सर एका जागी घाण केली की तिथे ती तीन दिवसात वाळते. त्याआधी तिथे करता येत नाही व मग चौथ्या दिवशी आपण पुन्हा त्याच जागेवर... तर ह्यासाठी जीपीएस वापरल्या जाते. ह्याने कोणते स्पॉटस्‌ उपलब्ध आहेत ते गिर्‍हाईकाला कळते. ज्या जागा रिकाम्या आहेत तिथे "खाली है" अशी सूचना मिळते तर ज्या अजून ओल्या आहेत तिथे "हाउस फुल्ल" असा आवाज येतो, व मग आपली हौस दुसरीकडे पुरवावी लागते. त्यामुळे होते काय की समजा कधी कधी अर्जंट कॉल आलेला असेल तर जागा हुडकण्यात वेळ वाया जात नाही..."
जयराम म्हणू लागले की अरे पण तुम्हाला हे परवडते कसे ? तर धोंडू कींव करत सांगू लागला की ते सिबल साहेबांना माहीत आहे सर. त्यांनी इनकमिंग फ्री केले आहे ना ? आता हे तांत्रिक कारण जयरामांना समजेना. ते म्हणू लागले की अरे तुम्ही इथे जे करता ते तर आउटगोईंग आहे ना ? मग इनकमिंग फ्री असले तरी....धोंडू नीट समजावत सांगू लागला अहो साहेब इनकमिंग म्हणजे आपल्या थ्रीजी सेटवर हो साहेब, शीचे नाही म्हणत आम्ही. स्पॉट पाठवणारा जीपीएस ने आम्हाला पाठवतो, रिकामी जागा दाखवतो, ते आम्हाला इनकमिंग असते व म्हणून फ्री पडते ना ? पार्लमेंटमध्ये दुसर्‍यांना मध्येच अडवायची सवय लागलेले जयराम, लगेच त्याला अडवत विचारतात : पण पाठवणार्‍याला तर खर्च लागेलच ना ? त्यावर त्यांच्या अज्ञानाची कीव करत धोंडू सांगतो, अहो साहेब, पाठवणारा बलवाचा भाच्चा आहे साहेब. त्याला सगळेच फ्री आहे, अगदी तिहारला कॉल करायचा तरी तो फ्री आहे !
ह्या भेटीने प्रभावित झालेले जयराम राहूलला गाठतात व त्याला सांगतात मी एक क्रांतीकारक बिल सदनात मांडू इच्छितो. राहूलला ते समजावून सांगू लागतात की सभागृहात कित्येक वेळा काही खासदार घाण करून ठेवतात व मग पुढच्या निवडणुकीलाच आपल्याला कळते. त्या ऐवजी मला फील्ड एक्स्पिरियन्स आहे तसे करू यात. प्रत्येक खासदाराकडे आपण एक आयफोन फोर-एस मोबाईल द्यायचा. त्यावर जीपीएस लोड करून द्यायचे. त्याने काय होईल, की खासदारांनी कुठे कुठे घाण करून ठेवली आहे ते जीपीएसने लगेच कळेल व मग ते आवाजी मतदान करतील S : "मंजूर है" किंवा तशी टयूनच मोबाईलवर लोड करता येईल. सगळे कसे ऍटोमॅटिक व मॉडर्न !

----------------------------------------------------------

सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

---------------------------------------------------------------------------------------------------
२) घाणीचे रत्न :
विमानात जे टॉयलेट असते त्यात पाणी फ्लशमध्ये कमी लागावे म्हणून एक निळ्या रंगाचे लिक्विड वापरतात. त्याचबरोबर ते लिक्विड खूप जोरात ओढून घेतलेल्या हवेबरोबरही सोडतात. त्यामुळे अगदी कमी पाण्यात कमोडमध्ये शीची विल्हेवाट लागते. हे वाहून नेलेले पाणी मग पुढच्या विमानतळावर विमान उतरल्यावर काढून टाकतात व नवीन पाणी भरतात. विमाने जेव्हा ३० हजार फुट किंवा ज्यास्त उंचीवरून जातात तेव्हा विमानाच्या बाहेरच्या भागाचे तपमान खूपच कमी म्हणजे खूपच थंड होते. अगदी मायनस ५०/६० डिग्रीज. एकदा काय झाले, हे टॉयलेट मधले पाणी वाहून नेणार्‍या एका पाईपला काही छेद गेल्याने ते तिथून गळू लागले. बाहेर प्रचंड थंडी असल्याने ते त्या पाईपच्या भोवती गोठलेच. त्या पाईपभोवती एक मोठठा निळा गोळा जमा झाला. जर्मनीत एका गावाच्या विमानतळावर उतरताना ह्या विमानाला काही काळ कमी उंचीवर बर्‍याच घिरट्या घालाव्या लागल्या. उंची कमी झाल्याने बाहेरचे तापमान चांगले तापायला लागले. त्यामुळे टॉयलेट पाईप भोवती जमा झालेला तो निळा गोळा पाईपला सोडू लागला व धप्पकन खाली पडला. खाली एक शेतकरी विमानाकडे पाहत होता. त्याच्याजवळच हा निळा गोळा पडला. तो गोळा एखाद्या रत्नासारखा दिसत होता. तो किंमती असेल असे समजून त्याला प्रथम वाटले की लपवून ठेवावा. पण बायकोच्या आग्रहामुळे तो तो गोळा पोलिसांकडे घेऊन गेला. पोलीसांनी शास्त्रज्ञांना विचारले. शास्त्रज्ञ खरेच हुशार होता पण डर्टी बोलणारा होता. तो म्हणाला की "आय थिंक इट इज नथिंग बट शिट !"

---------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, १७ ऑगस्ट, २०११

अण्णांच्या मागे परदेशी हात !
अण्णा हजारेंच्या आंदोलनाने सगळा देश पेटून निघाला. काही केले तरी लोक ऐकेनात. सगळे रस्त्यावर उतरले. हरताळ, कॉलेजे, शाळा बंद, लोकसभेच्या खासदारांना लोकांनी गराडा घातला, त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. पार्लमेंट जवळ जवळ बरखास्त करायची वेळ आली. आता ह्यावर शेवटचा उपाय काय म्हणून कपिल सिबल, पी.चिदंबरम, अंबिका सोनी, पंतप्रधान मनमोहन सिंग व राहूल गांधी अगदी शेवटचे खलबत करायला बसले. काहीच उपाय सुचेना. मनमोहनसिंग म्हणाले की मॅडम इंदिरा नेहमी म्हणायच्या ह्यामागे परदेशी शक्तींचा हात आहे व मीही तसेच सांगितले आहे, तर आपण त्या दिशेने चौकशी का करू नये ? आता दुसरा काही उपायच सुचेना म्हणून चिदंबरम ह्यांना सिबीआय मार्फत ताबडतोब चौकशी करायला सांगण्यात आले. चौकशी करता करता एक परदेशी महिला अमेरिकेत न्यूयॉर्क येथे कॅंसरवर काही उपचार घेत आहे असे सिबीआयला कळले. ते तिथे पोचले. दवाखान्याच्या रूमबाहेर एक नर्स उभी होती. त्यांनी तिला तिचे नावगाव विचारले. तिने नाव सांगितले ऍना व गाव इटाली. तेव्हढ्यात आतून मोठ्याने कण्हण्याचा आवाज आला व लगोलग त्राग्याने एक हुकूम आला.....गीव्ह एव्हरिथिंग टू ऍना.. सिबिआयचा तपासक आत जाऊन विचारू लागला, टू व्हूम मॅडम ? ...अरे ऍना, ऍना, ऍन्ना, . तपासक बाहेर आला. त्याने चिदंबरम साहेबांना फोन लावला. म्हणाला साहेब ती परदेशी व्यक्ती सापडली. तिने सांगितले आहे की गीव्ह एव्हरिथिंग टू अन्ना. चिदंबरमचा विश्वासच बसेना. पण आता मॅडमच सांगताहेत तर काय करा ? तरी त्यांनी खात्री करण्याकरिता विचारले....व्हाट ? टू अण्णा ? तिकडून उत्तर दिले सिबिआयच्या अधिकार्‍याने की यस सर...टू अण्णा ...असेच मॅडम म्हणताहेत.
पंतप्रधान खुश झाले, म्हणाले बघा मी म्हणत नव्हतो का, परदेशी शक्तीचा हात निघाला ना ? ठीक आहे चिदंबरमजी, आता ह्या परदेशी शक्तीचा जो हुकूम आहे त्याप्रमाणे अण्णाजी को सब दे दो भाई...क्या साब, लोकपाल भी दें दें ? हां दे दो !

सोमवार, १ ऑगस्ट, २०११

मद्यराष्ट्र
महाराष्ट्र देशी ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ वगैरे सर्व अन्नधान्यापासून मद्य करायचे कारखाने सुरू झाले व मद्याचे पाटच्या पाट इथे वाहू लागले. तेव्हा लोकांना ओळखायला सोपे जावे व जाज्वल्य निष्ठा निर्माण करावी म्हणून सर्वानुमते ठरले की ह्या देशाचे नाव आता राहील : मद्यराष्ट्र
मद्यराष्ट्राचा झेंडा : वरचा रंग असेल रेड वाईन चा तांबडा; ( रेड वाईनची आडवी बाटली )
मधला असेल जिनचा पांढरा; ( जिनची आडवी बाटली )
व खालचा रंग असेल शॅंपेनचा हिरवा; ( शॅंपेनची आडवी बाटली )
अशोक चक्राऐवजी असेल XXX ( ट्रिपल एक्स रमच्या तीन फुल्या )
झेंडा लावायला जो खांब लागतो त्याऐवजी असेल "खंबा".
मद्यराष्ट्राची राजधानी : ही असेल बारामतीजवळ "बासमती", तांदूळ नव्हे , दारूचा बास व मती, बास-मारती !

मद्यराष्ट्राचा स्वातंत्र्यदिन : गटारी अमावस्या

मद्यराष्ट्राचे चलन : सर्वात ज्यास्त किमतीचे चलन असेल "बॅरल", मग "खंबा", आणि गरीबांसाठी असेल क्वार्टर

मद्यराष्ट्राची अधिकृत प्रार्थना : गुरुर्र रम्मा, गुरुर्र व्हिस्की, गुरुर्र व्होडका, जिनेश्वरा ;
गुरुर्र स्कॉचा, परम ब्रॅंडी, तस्मै श्री बीयरे नम: ;
ओम श्री अल्कोहलाय नम:

मद्यराष्ट्राची हिंदी प्रार्थना : जिन मे बसी जानकी, रम मे बसे राम ;
व्हिस्की मे बसे विष्णू, शॅंपेन मे बसे शाम ;
किस किस का त्याग करू मैं, हर बॉटल मे भगवान !

मद्यराष्ट्राचा अधिकृत शेर : कहां मयखानेका दरवाजा गालिब, और कहां वाईज
पर इतना जानते है, कल वो जाता था, कि हम निकले.
( कुठे दारूच्या गुत्त्याचा, मयखान्याचा, दरवाजा आणि कुठे वाईज ( मुल्ला, ह्याने दारू पिणे निषिद्ध मानतात,) , पण मी जाणतो की काल तो निघत होता, तेव्हाच मी शिरत होतो, म्हणजेच मद्यराष्ट्रात सगळेच मद्यपी ! )

मद्यराष्ट्राच्या क्रिकेट टीमचा कोच : सर्व टीम तर्र ! कोणीही बॅटिंग करण्याच्या अवस्थेत नाही. कोच धीर देतोय. तो म्हणतो बॅट तो पकड ! प्लेयर म्हणतो मला तीन बॅटस्‌ दिसताहेत . कोच म्हणतो कोई बात नही, बीच वाली बॅट पकड . प्लेयर क्रीज पर्यंत जातो व परत येतो. अब क्या ? मुझे बॉल भी तीन तीन दिख रहे है.कोच--कोई बात नही, बीच वाले बॅटसे बीच वाला बॉल को मारो . प्लेयर जातो. कसाबसा उभा. बॉल येतो. ह्याचा स्लिप मध्ये कॅच उडतो. प्लेयर माघारी. कोच म्हणतो क्या हुआ. कॅच कैसे उडा ? अरे साबजी मैने बाजूवाली बॅटसे बाजूवाले बॉलको मारा और ये ऐसा हुआ !

मद्यराष्ट्राचा पोलीस एका बेवड्या ड्रायव्हरला पकडतो तेव्हा :
अबे ए बेवडे, सिग्नल दिखता नही क्या ?
बेवडा : दिखता है ना !
पोलीस : अच्छा तो बोल रेड के बाद क्या आता है ? बेवडा: ऑरेंज ,
पोलीस : और ऑरेंज के बाद ?
बेवडा: ग्रीन.
पोलीस : और ग्रीन के बाद ?
आता बेवडा आऊट. तो म्हणतो, मेरे क्या मालूम, ग्रीन के बाद तो मै जाता हूं. मुझे क्या पता कौनसा सिग्नल ?

मद्यराष्ट्रातल्या गल्लोगल्लीतला सीन :
तीन मजली इमारत. बाल्कनीत एक बाई उभी. खाली तीन चार बेवडे. त्यातला एक ओरडतो; ओ कांताबेन , ती ओरडते, सूं छे ?
बेवडा म्हणतो : तमारा वर पंकजभाई छे ?,
कांताबेन : हां छे !;
बेवडा: क्यां छे ?;
कांताबेन : बार गया छे !;
बेवडा : अमे बार माथीच आवीये छे ;
कांताबेन : तो ? ;
बेवडा : जरा निचे आवीने जोवो तो, आमारी माथी पंकज भाई कोण छे !

मद्यराष्ट्राचे मराठी मद्यराष्ट्रगीत : बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक मद्यराष्ट्र देश हा
गगनचुंबी इमल्यांचे जिथे नित्य ढासळणे
प्राशनानंतरी जिथे गगन ठेंगणे
आकांक्षा नित्य मद्य जलाविना पिणे
तेथ अडे सर्व काम, मद्यालयाविणे
पौरुषासी चटक जेथ नित्यही महा ॥ ध्रु ॥

मद्यराष्ट्राची अधिकृत विमानसेवा : किंगफिशर

मद्यराष्ट्राचे न्यायालय : रॉयल चॅलेंज

मद्यराष्ट्राचे अधिकृत वाहन : जॉनी वॉकर

मद्यराष्ट्राचे अधिकृत वादक : बॅगपाइपर

मद्यराष्ट्राचा अधिकृत गुरू : ओल्ड मॉंक

मद्यराष्ट्राची राष्ट्रीय फळे : मोसंबी, नारिंगी, अंगूर

मद्यराष्ट्राची अधिकृत कार्यालये : बार, देशी-बार, लेडीज-बार, बारबार

मद्यराष्ट्राचे अधिकृत ब्रॅंड-ऍंबॅसेडर : बार-बाला

मद्यराष्ट्राचे ब्रीद-वाक्य : पी.

मद्यराष्ट्राच्या टीव्हीवरचे प्रसिद्ध चॅनेल्स : पी-टीव्ही; पी-२४ तास ; पी-२४X७ ,

मद्यराष्ट्राची शिस्त : रस्तोरस्ती पिण्याची व्यवस्था असली तरी, शिस्तीत, ऑड दिवशी एका बाजूला पी-वन, तर दुसर्‍या दिवशी दुसर्‍या बाजूला पी-टू !

मद्यराष्ट्रात महत्वाची सबसिडी कशाला : सोडा, व बर्फ

----------------------------------------------------------------------------------------------------------

शनिवार, ३० जुलै, २०११

उसने-हसणे
-------------------------------------------------------------------------
पावसाळा/वर्षा / बारिश
---------------------------------------------
१) पोचलेली आसामी
एका माणसाची बायको भयंकर कजाग होती. सारखी सगळ्यांशी भांडायची. माणूस अगदी त्रस्त झाला होता. काही काळाने त्या बायकोला एक दुर्धर रोग झाला व त्यात ती मेली. ( नवर्‍यांनो देवाकडे असे काही मागू नका, असे फक्त जोकमध्येच होते !). रीतीप्रमाणे सर्व संस्कार त्या माणसाने केले. स्मशानात त्याने चितेला आग लावली अन्‌ प्रचंड गडगडाट झाला, वीजा चमकू लागल्या व धो धो पाऊस पडू लागला. माणसाने किंचित वर पाहिले व म्हणाला : "इतक्यात पोचली वाटतं, वर !"

---------------------------------------------------------------------------------------------------
२) एक वैज्ञानिक प्रश्न
खूप वर्षांपूर्वी दादर चौपाटी व बांद्रा चौपाटी येथे पोलीस बॅंड पथक रोज संध्याकाळी छान बॅंड वाजवीत असत. त्यांच्यासाठी एक गोल चबुतरा बांधलेला असे, ज्याला बॅंड-स्टॅंड असे म्हणत. जसे बांद्रा-बॅंड-स्टॅंड . ह्या पथकात, क्लॅरिओनेट, बासरी, ब्रासचे भोंगे, ड्रम वगैरे असून त्यांना मार्गदर्शन करणारा एक कंडक्टरही असे. एकदा पावसाळयाच्या दिवसात संध्याकाळी ते बॅंड वाजवत असताना अचानक जोराचा पाऊस आला, ढगांचा गडगडाट, झाला व विजाही चमकू लागल्या. आता समजा वीज तिथे पडलीच तर ती कोणावर पडेल ?
वैज्ञानिक उत्तर : वीज नेहमी कंडक्टरवरच पडते. ( कंडक्टर म्हणजे वीज-वाहक पदार्थ )

--------------------------------------------------------------------------------------------------
३) आत खेळा बरे !
मदर कांगारू म्हणजे आई-कांगारूंना पाऊस अजिबात आवडत नाही. का बरे ?
उत्तर : मग मुले आत खेळतात ना !

------------------------------------------------------------------------------------------------
४) स्लोकेन
पावसाळयात साधारणत: वारे वादळही वाहू लागतात. आपण ज्याला वादळ म्हणतो त्याला इंग्रजीत हरिकेन असे म्हणतात. हरिकेन मध्ये हवा खूपच फास्ट वाहात असते. ती जरा स्लो का वाहात नाही बरे ?
उत्तर : हरिकेन मधली हवा स्लो वाहिली तर मग ते लोक त्याला स्लोकेन म्हणाले असते ना !

५) चेंज हवी, चेंज हवी
एका बस-कंडक्टरची बायको खूप मदत करणारी होती. त्याला वेळच्या वेळी डबा, युनिफॉर्म वगैरे तर द्यायचीच शिवाय मदत म्हणून चिल्लरही गोळा करून त्याला मदत करायची. एकदा पावसाळ्यात एकसारखा दोन तीन दिवस पाऊस पडत होता. सगळे घरीच वैतागून थांबले होते. पण कंडक्टरची बायको एवढ्या पावसात पर्स घेऊन निघाली. दारापासून परत आली, पर्सची चेन उघडली व उघडी पर्स घेऊन पावसात भिजत निघाली. का बरे असे ?
उत्तर : अहो तिला वेदर मध्ये चेंज पाहिजे होता !

६) रेन कार्यशाळा
एकदा पावसावर, म्हणजे रेन वर, अमेरिकेत एक कार्यशाळा भरविण्यात आली होती. देशोदेशीचे तज्ज्ञ त्यासाठी गेले होते. मुंबई महानगरपालीकेचा एक इंजिनिअरही त्याला गेला होता. परत आल्यावर तिथे काय शिकवले ते सांगण्यासाठी त्याचे एक भाषण ठेवण्यात आले होते. तो सांगू लागला : फॉरेन का रेन और इंडिया का रेन मे भौत फरक है । फॉरेन मे जब रेन पांच मिनिट के लिये भी रुकता है तो स्टॉर्म-वाटर-ड्रेन और स्लोप के वजह से पूरा पानी गायब होता है ।
तेव्हढ्यात प्रेक्षकातला एक नागरिक उभा राहून सांगू लागला : और इंडिया का रेन के बाद पांच मिनिट में पूरा रोड गायब होता है ।

-----------------------------------------------------------------------------------------------------
७) सीनीयर्सचा प्रॉब्लेम
सीनीयर सिटिझन्स पावसाळ्यात अगदी जय्यत तयारीने बागेत येतात. ओल्या बाकावर पॅंट ओली होऊ नये म्हणून प्लॅस्टिकची घडी करून आणलेली पिशवी, व पाऊस पडलाच तर मोठ्ठी छत्री ! पण एक सिनीयर सिटीझन इतके सीनीयर होते की थोडासा झिरझिर पाऊस सुरू झाला की छत्री उघडून आरामात डुलकी घेत बसत. मग शेजारचा त्यांना सांगे : अंकल बारिश बंद हुआ है, छाता बंद कर सकते हो !. त्यांना मग खूपच खजील वाटायला होई. मग त्यावर त्यांनी एक युक्ती काढली. छत्रीला एक मोठे भोक केले . कशाला ? अहो, पाऊस थांबला की नाही ते आता त्यांना त्यातून दिसेल ना !

८) पैसे का सुखाना
स्टेट बॅंकेतल्या एका कॅशीअरची एकदा बदली झाली. त्याला खूप अनुभव असल्याने प्रमोशनवर त्याला थेट अमेरिकेत वाशिंग्टन येथे पाठवण्यात आले. तो खुषीतच तिथे पोचला. काही दिवस झाले. आणि वाशिंग्टन मध्ये जोरदार पाऊस झाला. आपल्याकडच्यासारखेच रस्तोरस्ती फ्लडिंग झाले. बॅंकेचे तळघरातले लॉकर्सही बुडाले. नंतर इन्स्पेक्शन केले त्यात सगळे पैसे भिजल्याचे आढळून आले. आता भिजलेल्या पैशांचे करायचे काय ? ते लोक त्याला विचारू लागले की तुम्हाला तर दांडगा अनुभव असेल. तुम्हीच सांगा काय करायचे ? तो आत्मविश्वासाने सांगू लागला : मुंबईत ना असाच एका २६ जुलैला आमची बॅंकही डुबली होती. आमचे पैसेही भिजले होते. मग आम्ही ते पंख्याखाली पसरले, लवकर वाळावेत म्हणून मोठे मोठे बल्बही लावले. झाले दोन दिवसात सगळ्या नोटा कोरड्या झाल्या. झाले त्याच्या सल्ल्यानुसार अमेरिकननांनी भिजलेले पैसे पंख्याखाली वाळवायला ठेवले, एकदोन हीटरही लावले. पण पैसे काही सुकेचनात. कॅशियर चक्रावला. त्याने आपल्या गुरूला मुंबईला फोन लावला. त्यावर डॉलरच्या नोटा का सुकत नाहीत त्याचे विवेचन गुरू करू लागला : अपना महात्मा गांधी है ना, शर्टबिर्ट कुछ डालता नही था, सिर्फ एक पतली धोती थी. जल्दी सुख जाती है । इनके डॉलर के उप्परका बेंजामिन साला शर्ट, टाय, थ्री-पीस सूट ऐसा डालेला होगा तो इतने जल्दी कैसे सुकेगा ? ड्रायर ट्राय करो !

-----------------------------------------------------------------------