शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

त्रिनिदाद इज ए कंट्री

त्रिनिदाद इज कंट्री
------------------------
कधी कधी आपल्याला इंग्रजीतल्या शिव्या माहीत नसतात, त्यामुळे तिकडच्या टग्या लोकांचे विनोद कळत नाहीत. मी वेस्ट इंडीजला असताना त्यांचा एक विनोद माझ्या डोक्यावरून गेला. तुम्हाला कळतो का पहा :
त्रिनिदाद हे वेस्ट इंडीज मधले मोठे बेट व शहर. इथले आफ्रिकन अमेरिकन हे टगे असून स्वतः वर जोक्स करण्यात माहिर आहेत. ते त्रिनिदाद वर असा जोक करतात :
If Trinidad had a king, it would be called a kingdom; but it is a country !
( क्लू : तिथल्या पंतप्रधानाला शिवी म्हणून हा जोक होता व मादरxx ह्या शिवीला इंग्रजीत ते मदरकंट म्हणतात )

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

बै कोणाला म्हणतात ?

ज्युलियन ह्यांची एक कविता आहे :
जू बैसले मानेवरी, चाबूक हा पाठीवरी...
तर ह्यातले जू ( बैलाच्या मानेवरचे लाकडाचे ओढण्यासाठी केलेले ) म्हणजे "ब्वा" (बुवा) व ते जिच्यावर आहे ती "बै" , आणि हे ज्यांना सलते ते "मानेवरी" (मान्यवर) , आणि जे हे मानत नाहीत, त्यांच्या पाठीवर चाबूक ( मारा) !

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ७१

------------------------------------------ 

 

न देवा: दंडम् आदाय रक्षति पशुपालवत् |

यं तु रक्षितुम् इच्छंति बुद्ध्या संविभजन्ति तम् ||

 

( अर्थात : भगवान किसी का रक्षण करने के लिये हात मे दंडा ले के नही बैठता. जिस का रक्षण करना वह चाहता है उस को वो बुद्धी का वरदान दे देता है. ).

---------------- 
भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ७२

------------------          

 

कं संजघान कृष्ण: ?

( कृष्ण ने किस को मारा ? )

का शीतलवाहिनी गंगा ?

( शीतल जल वाली गंगा कहां है ? )

के दारपोषणरताः ?

( दारे का पोषण करने वाले लोग कौन ?)

कं बलवन्तम् न बाधते शीतम् ?

( कौन से बलवान को ठंड नही लगती ?)

 

इन सभी का उत्तर श्लोक मे ही है. पहिला अक्षर और दुसरा अक्षर जोड के उत्तर आता है. जैसे :

कंस ; काशी ; केदार ( किसान ) ; कम्बल पहना हुवा कम्बलवंत

 

------------------     
भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ७३

-------------------------------- 

 

व्रजत्यध: प्रयात्युच्चै:, नर: स्वैर् एव चेष्टीतै: |

अधः कुपस्थ खनक:, उर्ध्वं प्रासादकारक: ||

 

( अर्थात : आदमी की तरक्की या अधोगती उसके काम से होती है. जैसे कोई अगर कुंवा खोद रहा हो तो वो जैसे कुंवा नीचे जायेगा उस के साथ साथ आदमी भी नीचे नीचे जायेगा. परंतु कोई अगर उंची हवेली बांध रहा हो तो वो हवेली के साथ साथ खुद भी उंची जगह जायेगा. प्रगती और अधोगती का प्रमाण यहा प्रत्यक्ष उंची नीची जगह मे सोची गयी है जिस के उपर आज हमे हंसी आ सकती है. जैसे एक जमाने मे जिन्होने तेल के गहरे कुंवे खोदे ते उनको बहुत लाभ हुवा और प्रगती हुई. फिर भी उंच नीच का प्रत्यक्ष प्रमाण ले के प्रगती या अधोगती समझना यह सोचने के प्रयास पर हंसी लाती है. ).

----------------        

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ७३
-------------------------------- 

व्रजत्यध: प्रयात्युच्चै:, नर: स्वैर् एव चेष्टीतै: |
अधः कुपस्थ खनक:, उर्ध्वं प्रासादकारक: ||

( अर्थात : आदमी की तरक्की या अधोगती उसके काम से होती है. जैसे कोई अगर कुंवा खोद रहा हो तो वो जैसे कुंवा नीचे जायेगा उस के साथ साथ आदमी भी नीचे नीचे जायेगा. परंतु कोई अगर उंची हवेली बांध रहा हो तो वो हवेली के साथ साथ खुद भी उंची जगह जायेगा. प्रगती और अधोगती का प्रमाण यहा प्रत्यक्ष उंची नीची जगह मे सोची गयी है जिस के उपर आज हमे हंसी आ सकती है. जैसे एक जमाने मे जिन्होने तेल के गहरे कुंवे खोदे थे उनको बहुत लाभ हुवा और प्रगती हुई. फिर भी उंच नीच का प्रत्यक्ष प्रमाण ले के प्रगती या अधोगती समझना यह सोचने के प्रयास पर हंसी लाती है. ).
----------------        


शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६८

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६८

-------------------------------------------

 

षटकर्णो भिद्यते मन्ञ: चतुष्कर्ण: स्थिरो भवेत् |

द्विकर्णस्य तु मंत्रस्य ब्रह्मापी अंतं न गच्छति ||

 

( अर्थात : कोई गुप्त रहस्य छ कानो पर ( याने तीन आदमी को ) पडे तो वह गुप्त नही रहता और वह सब जान जाते है . वही गुप्त चीज अगर चार कानो पे ( याने दो आद्मियो के बीच ) पडती है तो वह दो आद्मियो के बीच स्थिर रहती है. और जो चीज सिर्फ दो कानो पे ( याने एकही आदमी को ) पडती है वह तो खुद ब्रह्मदेव भी नही जान सकता. इस लिये कोई गुप्त चीज किसी को भी नही कहनी चाहिये. ).

------------------------- 

कवी गायब यार

मख्खी टू मख्खी भाषांतर...!

आमच्या काळी आम्ही इंजिनियरिंग ड्रॉंईंग मध्ये मख्खी टू मख्खी कॉपी करीत असू. म्हणजे ज्याचे कॉपी करायचे त्याच्या शीट वर माशी बसलेली असेल तर आपलीही माशी तिथेच बसलेली असली पाहिजे.

असेच म्हणे भाषांतराचे एक मशीन आले आहे.

त्यात “कवी गुलजार” ह्यांचे भाषांतर :

“कवी गायब यार”

( गुल म्हणजे गायब व जार म्हणजे यार ) असे झाले.

.....पण ही काही चूक नाही, वास्तवच ते !

----------------------------------------

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६५

 भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६५

------------------------------------- 

 

दुर्जनं प्रथमं वंदे, सज्जनं तदनंतरं ||

 

( अर्थात : मै पहले दुर्जन लोगो को वंदन करता हूं और बादमे सज्जन लोगो को वंदन करता हूं. आप पूछेंगे के ऐसा उलटा क्यू ? तो ऐसा है के पहले दुर्जन को वंदन करनेसे वे खुश रहेंगे और सज्जन तो अच्छे लोग होते ही है और वे उनको बाद मे वंदन करनेसे मेरी शत्रुता नही करेंगे. ).

 

-----------------------------------  

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६४

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६४

------------------------------------------- 

 

निर्धनं निधनम् एतयो: द्वयो: तारतम्यविधिमुक्तचेतसाम |

बोधनाय विधिना विनिर्मिता रेफ: एव जयवैजयन्तिका  ||

 

( अर्थात : “निधन” का मतलब धनहीन अथवा मृत्यू. इन दोनो अर्थ के बीच का फरक याने कम जादा रहना ( याने तारतम्य ) समझने के लिये ब्रह्मदेव ने रेफ ( र्फ  ) का निर्माण किया है . जैसे की यह धनहीन के लिये जयपताका ही है . निर्धन लिखते समय यह पताका या रेफ देना पडता है और यह ही इसका निधन ( मृत्यू ) अर्थ से फरक बताता है. गरीबी से मृत्यू अच्छा यह अर्थ स्पष्ट करने की यह लिखने की तरकीब है. निर्धन से निधन अच्छा यह अर्थ “निधन” के ध उपर रेफ देने से निकलता है.).

 

---------------------------- 

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : 57

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ५७

 

सुबद्धस्य अपि भारस्य पूर्वबंध: श्लथायते |

 

( अर्थात : अर्जुन ने जब सुभद्रा से शादी की तब द्रौपदी अर्जुन को सवाल करते हुये कहती है : अच्छी पक्की बांधी हुई गठडी को दूसरी रस्सी से और बांधोगे तो पहली रस्सी ढिली पडही जाती है . आपने यह दुसरी शादी करने के बाद मेरे उपर का आप का प्रेम कम ही हुआ है. ).

------------------------------

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६३

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६३

----------------------------------------------- 

 

आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलम् अभूत् तत् नारिकेलांतरम्

प्राय: कंटकितम् तथैव पनसं, जातं द्विधा उर्वारुकम्  |

आस्ते अधोमुखम् एव कादलम् अलं द्राक्षाफलं क्षुद्रता

श्यामत्वम् बत जाम्बवं गतं अहो मास्तर्यदोषाद् इह  ||

 

( अर्थात : अपने फल ऐसे क्यो है इसकी कल्पना यहा की गयी है. शायद आम की तारीफ करने से बाकी फल असंतुष्ट हो गये होंगे ऐसी यहा कल्पना की गयी है. आम की तारीफ सुन के नारीयल का पानी पानी हो गया, फणस को रोमांच/कांटा  खडे हुये, वाळक ( एक प्रकार की ककडी ) के दुःख से दो तुकडे हो गये, केले ने अपनी गर्दन शरम से नीचे की, अंगूर सुकड कर छोटे हो गये और जाम्बून मत्सर से काले पद गये. ).

-------------------------------       

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

विनोदाचे भागध्येय : धक्का

विनोदाचे भागध्येय : धक्का

--------------------------

ज्या विनोदावर आपण फिदी फिदी हसलो होतो, तोच जर पुन्हा ऐकला तर हसू तर येत नाहीच , पण कीव येते ! हमखास खसखस पिकवण्याचे सामर्थ्य असलेला विनोद हा प्रकार अशा शापाला वाहिलेला आहे. तो कायम नवा कोराच असावा लागतो !

विनोद हा प्रकार अपेक्षांचे प्रचंड भार वाहणारा असतो. एकदा आचार्य अत्रे ह्यांना आम्ही औरंगाबादला आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला बोलावले होते व त्यांच्या भाषणाचा विषय होता : विनोद. त्यात ते सांगत होते की विनोदात नेहमी अपेक्षांना धक्का द्यावा लागतो, तरच तो हसू आणतो. त्यावर त्यांनी एक उदाहरणा दाखल विनोद सांगितला . तो असा : एकदा ते एका कार्यक्रमासाठी कुठे बाहेरगावी गेले होते. कार्यक्रम आटोपता आटोपता रात्र झाली व कसेबसे स्टेशनावर आले तेव्हा गाडी सुटतच होती. समोर आलेल्या डब्यात ते चढले. डबा रिकामाच होता. सकाळी ते दरवाज्यात उभे राहून स्टेशन पाहू लागले तो आजूबाजूचे लोक हसत होते. त्यांना वाटले आपण किती लोकप्रिय ! आपल्याला लोक दाद देत आहेत. असे दोन तीन स्टेशनावर झाले व  स्वारी खूष झाली. गाडीतून उतरताना त्यांनी सहज डब्याकडे पाहिले तर तो स्त्रियांचा राखीव डबा होता ! अत्रे म्हणतात की हाच विनोद सांगतांना मी आधीच सांगितले असते की मी चुकून स्त्रियांच्या डब्यात बसलो होतो, तर काहीच हसू आले नसते. तर विनोदासाठी अपेक्षांना धक्का द्यावा लागतो.

विनोद पेरण्यासाठी कायम असे धक्के द्यावे लागतात ! एकदा वाचकाला एक धक्का बसला की तो पुढच्या वेळेस सतर्क राहतो व त्याला हसवायचे असेल तर मग वेगळा धक्का द्यावा लागतो. कायम नवीन धक्क्याचे भागध्येय ल्यालेला विनोद हा एकमेव प्रकार आहे !

----------------------

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

येऊ नयेचे निमंत्रण

एका निमंत्रण पत्रिकेत असे होते :
आपली उपस्थिती हाच आहेर आहे.
कृपया आहेर आणू नये.

( मद्दडां साठी अर्थ : येऊ नका!  )😀😁😂😇😬😯😆😅😄😢

सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : 51

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ५१  

 

क्षणे तुष्ट:, क्षणे रुष्ट:, तुष्टो रुष्ट: क्षणे क्षणे  |

अव्यवस्थितचित्तानां प्रसादोSपि भयंकर:  ||

 

( अर्थात : जिसका मन स्थिर नही, ऐसे आदमी का प्रसाद भी भयंकर होता है. ऐसा आदमी क्षण मे प्रसन्न तो क्षण मे गुस्से मे, ऐसा हर पल प्रसन्न अथवा क्रोधित रहता है. अभी प्रसन्न है समझ कर आप उससे बर्ताव करोगे तो अगले पल मे क्रोधित हो के क्या करेगा उसका भरोसा नही. ).

--------------------------------------------

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

पूल-ब्रिज-सेतु

पूल-ब्रिज-सेतु

-------------------- 

पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते, पण इथे पूलच वाहून गेला आहे. पूलही कसा, तर शंभरी भरलेला. पुलांचे असे वाहून जाणे काय दाखवते ? पाण्याची मातब्बरी की पुलाची ? का आपल्या अज्ञानाची वाहती गंगा ? वैयक्तिक पातळीवर आपल्याला पुलाचे काय कळते ?

आम्ही १९६१ साली इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो तेव्हा सालाबादाप्रमाणे आम्ही शेजारच्याच संगमच्या रेल्वे पुलाची “फॅक्टर ऑफ सेफ्टी” काढायला गेलो होतो. आमच्या मोजमापाने ती चार भरत होती व प्रत्यक्षात म्हणे सहा होती. म्हणजे सहा पटीने जास्त भार आले तरी त्या पुलाला काही ढिम्म होणारे नव्हते.

महाडच्या पुलाशेजारी एक नवीन पूल झालाय, त्याच्याने पाण्याचा मारा जुन्या पुलाच्या पायथ्यावर होवू लागला व त्याने त्याच्या कमानी खाली आल्या. शिवाय वाळू उपसल्याने पुलाच्या भक्कम पायालाच खिंडार पडले होते.

असे पूल वाहून गेल्यावरच आपल्याला का कळते ? कारण एरव्हीचे आपले कळणे अगदी वरवरचे असते. जशी  पुलावरून जाणारी वाहने ! त्यांना स्वतःचे वजन माहीत नसते, पुलाची ताकद माहीत नसते, ताकद कमी झालीय का तेही माहीत नसते. कळते ते पूल वाहून गेल्यावरच ! असल्या कळण्याने  काय कप्पाळ कळते ?

बरे ही अज्ञानाची गटार-गंगा फक्त आपल्याकडेच वाहते आहे असे नाही तर सॅन फ्रान्सिस्को इथला प्रसिद्ध बे ब्रिजही वादाच्या भोवऱ्यात आहे. कारण कुठला तरी एक पार्ट रिजेक्ट झाला आहे म्हणे व त्याने त्या ब्रिजला धोका आहे.

आपले ज्ञानाचे सेतु केव्हा बळकट होणार ?

------------------

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

आमंत्रण निमंत्रण

--------------------------------------
आमंत्रण, निमंत्रण
------------------------
आमंत्रण व निमंत्रण हे दोन्ही सकारात्मक शब्द असून त्यात एक चांगले वा वाईट असे काही नाही. दोन्हीचा अर्थ बोलावणे, अवतणे असाच होतो. दोन्ही कडे पायाभूत शब्द आहे मंत्र ज्याचा अर्थ प्रार्थना, स्तोत्र असा आहे. आ हा उपसर्ग लावून पर्यंत, पासून ह्या अर्थाचे शब्द आपण अनेक करीत असतो, जसे : आजन्म ( जन्मापासून), आमरण ( मरणापर्यंत ), आक्रमण , आकर्ण, आक्रोश वगैरे. तसेच नि हा उपसर्ग लावून आपन अनेक शब्द करतो ज्याचा अर्थ ह्याने युक्त, वा लुप्त असा होतो. जसे: निनाद, निपुण,  नि ह्या उपसर्गामुळे नकारात्मकता येते असे आपल्याला वाटते खरे पण नि पासून सुरू होणारे अनेक शब्द असे आहेत की जे सकारात्मक अर्थाचेच आहेत, जसे : निकट, निकष, निकुंज, निकेतन, निखालस, निखिल, निगडित, निगमन, निगराणी, निग्रह, निजणे, निर्णय, नित, नितळ, नितान्त, निदान, निनाद, निपुण, निभणे, निमंत्रण वगैरे. त्यामुळे मंत्र व मंत्र म्हणणे म्हणजे मंत्रण करण्यापर्यंतचे बोलावणे किंवा मंत्रण करण्याने युक्त असे बोलावणे असाच दोन्ही ( आमंत्रण, निमंत्रण ) शब्दांचा अर्थ होतो व दोन्ही अर्थ सम-बलाचे आहेत. असेच समान अर्थाचे शब्द आहेत : आयोजन-नियोजन , आयोग-नियोग.
  संस्कृत व्याकरणात हे दोन शब्द जरा भिन्न अर्थांनी वापरलेले दिसतात.  "गच्छेत्" सारख्या रूपांचा अर्थ सांगताना पाणिनीने विधि-निमन्त्रण-आमन्त्रण-अधीष्ट-सम्प्रश्न-प्रार्थन (पा.सू. ३।३।१६१) इतके वेगवेगळे अर्थ दिले आहेत. त्या सगळ्यांची चर्चा मला करायची नाही, पण निमन्त्रण आणि आमन्त्रण हे दोन वेगळे अर्थ दिले आहेत.  त्यातला फरक काशिकावृत्तीमध्ये "निमन्त्रणम् नियोगकरणम्, आमन्त्रणम् कामचारकरणम्" असा दिला आहे.  म्हणजे निमन्त्रण शब्दाचा "हे केलेच पाहिजे" (अवश्यकर्तव्ये प्रवर्तना, यत्र अकरणे प्रत्यवाय:) असा नियोग म्हणजे आज्ञा असा अर्थ आहे, तर आमन्त्रण म्हणजे तुमच्या इच्छेने हे करायचे असले तर करावे, केले नाही तर काही हरकत नाही (यत्र अननुष्ठानेऽपि न प्रत्यवायस्तत्र प्रवर्तना).  संस्कृतवाङ्मयात हा काटेकोर फरक सगळीकडे दिसत नाही.  महाभारतात दमयन्तीचा बाप भीमराजा तिच्या स्वयंवराचे निमन्त्रण सर्व राजांना पाठवितो - स संनिमन्त्रयामास महीपालान्.  अर्थात् ही आज्ञा नाही, पण आग्रहाचे बोलावणे आहे. 
निमंत्रण ही आज्ञा/कर्तव्य असल्याने ज्यांनी खरेच समारंभाला यावे असे वाटत असेल त्यांना निमंत्रण द्यावे, तर आलात, जमले तर या असे ज्यांना म्हणायचेय त्यांना आमंत्रण द्यावे !
----------------------------------------------------

मित्र

-------------------------
मित्र
-----------
मला अजिबात मित्र नाहीत. त्याचे खापर मी माझ्या शब्दकोशावर फोडीन म्हणतो. कारण माझ्या शब्दकोशात आधी जो शब्द येतो तो आहे मित म्हणजे मोजका. आणि त्यानंतर येतो मित्र. त्यामुळे मोजकाच असलेला तो मित्र असा मी अर्थ काढला असावा.
आणि झालेही असेच. इंजिनियरिंगला पुण्याला हॉस्टेलला असताना आमच्याच मजल्यावर एक पारशी मुलगा होता. खरे तर तो इतका देखणा, गोरा, स्मार्ट आणि परत हुशार, असल्याने माझा मित्र होईल असे जाम वाटले नव्हते. पण तो होता बिजापूरचा व त्यामुळे त्याला मराठी चांगले येई. त्यामुळे आमची मैत्री झाली होती.
मैत्री म्हणजे किती दाट ! त्याकाळी जवळ जवळ दिवसातले २० तास तरी आम्ही बरोबर असू. त्याच्या नादाने मी नॉन-व्हेज खायला शिकलो, सिनेमे पाह्यले व त्याकाळात कॅंपातल्या ऑंट्याकडे जाऊन देशी ठर्राही प्यालो. सहा रुपये तासाने तो स्कूटर घेऊन यायचा व आम्ही अशा चकरा मारायचो. नंतर तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होता. तो होताच इतका हुशार की त्याच्याबद्दल मत्सर वाटायच्या आधी त्याच्या हुशारीचा अभिमानच वाटायचा. मग मी मुंबईला आलो व तो कुठे कुठे गेला, काय माहीत नाही. आम्ही चाळीस वर्षे भेटलो नाही. तरीही मला वाटे माझा मोजका मित्र तो हाच.
मग एकदा मी होस्पेटला नोकरीनिमित्त असताना बिजापूरहून जाताना त्याचा शोध घेतला. त्याला भेटलो, त्याचे घर पाहिले. आणि मला त्याला भेटल्याचे अपार वाईट वाटले. ज्याच्या बद्दल एवढ्या मोठ्या मोठ्या कल्पना मी बाळगल्या तो एका गल्लीत एका साधारणशा घरात राहात होता. मला ह्या नियतीचे फार वाईट वाटले. माझा भ्रमनिरास झाला.
ह्यालाही आता पंधरा वर्षे होत आली. त्यानंतरही आम्ही कधी परत भेटलो नाही.
आता माझे फेसबुकवर भले ६०० मित्र आहेत पण मित्र-दिवसानिमित्त कोण बरे माझा मित्र असा विचार केला तर फक्त त्याचेच चित्र सामोरे येते.
मित नंतर मित्र, हा क्रम लावणार्‍या शब्दकोशाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, ह्या मित्र-दिवसाच्या दिवशी !
-----------------------------------------

शनिवार, ३० जुलै, २०१६

Tail twister 2

🦁🦁🦁Laughing Lions : 4
--------------------------------
Once ,  there was a Lion Tail Twister.  While installing he was told that his job was to twist the tail. But the experienced Installing officer also cautioned, " Amongst these Lions you will find very venomous snakes... Cobras! But don't worry, most of the times they are sleeping. So be careful,  while tail-twisting don't step on the sleeping Cobra's tails!

Laughing lions:3

🦁🦁🦁Laughing Lions : 3
--------------------------------
Once ,  there was a Lion Tail Twister.  While installing he was told that his job was to twist the tail. He did twist the tail,...but his own tail. When asked why so,  he said,  टेल ट्विस्ट होनेसे मतलब, मेरी हो या तेरी !

Laughing lions : 4

🦁🦁🦁Laughing Lions : 4
--------------------------------
Once ,  there was a Lion Tail Twister.  While installing he was told that his job was to twist the tail. But the experienced Installing officer also cautioned, " Amongst these Lions you will find very venomous snakes... Cobras! But don't worry, most of the times they are sleeping. So be careful,  while tail-twisting don't step on the sleeping Cobra's tails!

Laughing Lions : 6

Laughing Lions 🦁🦁🦁
-----------------------------------------
SIGHT FIRST :
In Lionism one makes a beginning as Leo. Their sole/soul project is always LOVE AT FIRST SIGHT.
and when they graduate upto a retiring Lion they do the project SIGHT FIRST !

बुधवार, १३ जुलै, २०१६

सेलफोन का मोबाईल

सेलफोन का मोबाईल
अमेरिकेत ज्या फोनला सेलफोन म्हणतात, त्याला आपल्याकडे मोबाईल का म्हणतात ?
अहो, बराबरच् की ! आपली मानसं मोप बाईल वेडी नव्हं का ?

मंगळवार, १२ जुलै, २०१६

इथिओपियन मांजर !

ह्यावरून एक गंमत आठवली.
एकदा एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. हेल्दी बेबी सारखं हेल्दी मांजरांची. त्यात एका इथिओपियन मांजराला पहिले पारितोषिक मिळाले. लोक विचारायला लागले, असे कसे तिथे तर सारखा दुष्काळ असतो ना ? मग असे कळले की ती इथिओपियन मांजर नव्हती, तर तिथला वाघ होता !

सोमवार, ११ जुलै, २०१६

Purchasing

असाच आमच्या कंपनीत एक परचेस मँनेजर होता. तो सारखा चांगल्या चांगल्या ठिकाणी दौरे काढी. एकदा गेला की लौकर परतत नसे. एकदा त्याची बायको खूपच् वैतागली. तिने निरोप दिला की हा उत्तर देई I am still purchasing.  ह्यावर बायकोने निर्वाणीचा निरोप पाठवला व तो पाहताच तो तडक घरी माघारी फिरला. कारण बायकोने लिहले होते, If you don't return immediately,  I will start selling what you are purchasing!

टेल ट्विस्टर

🦁🦁🦁Laughing Lions : 3
--------------------------------
Once ,  there was a Lion Tail Twister.  While installing he was told that his job was to twist the tail. He did twist the tail,...but his own tail. When asked why so,  he said,  टेल ट्विस्ट होनेसे मतलब, मेरी हो या तेरी !

गुरुवार, ७ जुलै, २०१६

Laughing lions : 2

Once there was a new incoming President of one Lions Club, from a small town . He was lectured, very heavily, by visiting District Dignitaries on who should be seated where,  as per Protocol. He had a tough time,  arranging chairs on the Dias.
After the meeting, when he went home,  he had guests at home. His in-laws, sister in law and brother in law. They had come from the district place. 
Poor fellow had to sleep in veranda, as that was the right place, as per Protocol!
------

Laughing lions : 1

Once there was a President of one Lions Club.  He had practiced correct procedures and protocols throughout the year. He was so meticulous that he would not forget to put the Gaung to the bell, before adjourning a meeting.
Such a President went to Siddhi Vinayak temple to thank completion of his year. After paying respects to God, the Meticulous President went outside and rang the bell!  ( You know why!)

भालेराव के सुसंस्क्रुत जोक्स

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ४२

 

 

गणेश: स्तौति मार्जारं स्ववाहस्य अभिरक्षणे  |

महान् अपि प्रसंगेन नीचं सेवितुम् इच्छति  ||

 

( अर्थात : गणपती का वाहन है चूहा. उसके भलाई के लिये समय आने से गणपती खुद बिल्ली की स्तुती करते है. काम पडने पे बडे आदमी को हलके आदमी की तारीफ करनी पडती है. मराठी मे कहावत है, “अडला हरि गाढवाचे पाय धरी !” ).

---------------------------

भालेराव के सुसंस्क्रुत जोक्स

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ४१

 

अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च  |

अजापुत्रं बलिं दद्यात्—देवो दुर्बलघातक:  ||

 

( अर्थात : घोडे को बली नही देना, हाथी को बली नही देना, बाघ को बली नही देना, लेकीन बकरे को बली देना. भगवान दुर्बल का घात करता है ! ).

-----------------------

मंगळवार, १२ एप्रिल, २०१६

उसने हसणे
कोण कंजूष ? आजोबा की नातू ?
एकदा एका कंजूष माणसाचे आजोबा मरतात. त्याला वर्तमानपत्रात त्याची जाहिरात द्यायची असते. क्लासिफाईड मध्ये. क्लर्क म्हणतो रेट आहे एका शब्दाला ५०रु . कंजूष माणूस लिहितो : आजोबांचे दुखःद निधन . आता क्लर्क म्हणतो कमीत कमी पाच शब्द तरी हवेत . मग तो कंजूष माणूस लिहितो : आजोबांचे निधन, व्हीलचेयर विकणे आहे

-------------------------------
उसने हसणे
कोण कंजूष ? आजोबा की नातू ?
एकदा एका कंजूष माणसाचे आजोबा मरतात. त्याला वर्तमानपत्रात त्याची जाहिरात द्यायची असते. क्लासिफाईड मध्ये. क्लर्क म्हणतो रेट आहे एका शब्दाला ५०रु . कंजूष माणूस लिहितो : आजोबांचे दुखःद निधन . आता क्लर्क म्हणतो कमीत कमी पाच शब्द तरी हवेत . मग तो कंजूष माणूस लिहितो : आजोबांचे निधन, व्हीलचेयर विकणे आहे

-------------------------------

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

उंगली योगा
पॉवर योगा, कॉर्पोरेट योगा,....ऐसे एक नवा योगा आया है. उंगली योगा.
यह योगा करनेसे सबका स्वास्थ्य अपने फिंगरटिप्स पे नाचेगा . ये योगा कैसे करनेका ?
पहिली उंगली है अंगुठा. यह मजबूत करनेका तो करो “थम्स अप !” किसको ? जैसे हम लायन्स प्रोजेक्टस को करते है.
दुसरी उंगली है इंडेक्स फिंगर. ये करो अपनी तरफ, जब किसी काम का क्रेडीट अपनेको लेना है तो, और करो दुसरो की तरफ जब किसी को दोष देना है या ब्लेम करना है तो !
तिसरी उंगली है मिडल फिंगर. यह उंगली पर हजबंड अच्छा नाचेगा, नचाव नचाव...गुस्सा आया तो उंगली करो आडी !
चौथी उंगली है तिलक लगाने के लिये...दुसरोको और अपनोको.
पांचवी उंगली है किरंगळी ! ....यह दिखाव और जल्दी जाव....
जो यह उंगली योगा करेगा उसकी पांचो उन्गलिया घी मे !

---------------------------------