सोमवार, १० ऑक्टोबर, २०११

---------------------------------------------------------------------------------------------------
२) घाणीचे रत्न :
विमानात जे टॉयलेट असते त्यात पाणी फ्लशमध्ये कमी लागावे म्हणून एक निळ्या रंगाचे लिक्विड वापरतात. त्याचबरोबर ते लिक्विड खूप जोरात ओढून घेतलेल्या हवेबरोबरही सोडतात. त्यामुळे अगदी कमी पाण्यात कमोडमध्ये शीची विल्हेवाट लागते. हे वाहून नेलेले पाणी मग पुढच्या विमानतळावर विमान उतरल्यावर काढून टाकतात व नवीन पाणी भरतात. विमाने जेव्हा ३० हजार फुट किंवा ज्यास्त उंचीवरून जातात तेव्हा विमानाच्या बाहेरच्या भागाचे तपमान खूपच कमी म्हणजे खूपच थंड होते. अगदी मायनस ५०/६० डिग्रीज. एकदा काय झाले, हे टॉयलेट मधले पाणी वाहून नेणार्‍या एका पाईपला काही छेद गेल्याने ते तिथून गळू लागले. बाहेर प्रचंड थंडी असल्याने ते त्या पाईपच्या भोवती गोठलेच. त्या पाईपभोवती एक मोठठा निळा गोळा जमा झाला. जर्मनीत एका गावाच्या विमानतळावर उतरताना ह्या विमानाला काही काळ कमी उंचीवर बर्‍याच घिरट्या घालाव्या लागल्या. उंची कमी झाल्याने बाहेरचे तापमान चांगले तापायला लागले. त्यामुळे टॉयलेट पाईप भोवती जमा झालेला तो निळा गोळा पाईपला सोडू लागला व धप्पकन खाली पडला. खाली एक शेतकरी विमानाकडे पाहत होता. त्याच्याजवळच हा निळा गोळा पडला. तो गोळा एखाद्या रत्नासारखा दिसत होता. तो किंमती असेल असे समजून त्याला प्रथम वाटले की लपवून ठेवावा. पण बायकोच्या आग्रहामुळे तो तो गोळा पोलिसांकडे घेऊन गेला. पोलीसांनी शास्त्रज्ञांना विचारले. शास्त्रज्ञ खरेच हुशार होता पण डर्टी बोलणारा होता. तो म्हणाला की "आय थिंक इट इज नथिंग बट शिट !"

---------------------------------------------------------------------------------------------