मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६५

 भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६५

------------------------------------- 

 

दुर्जनं प्रथमं वंदे, सज्जनं तदनंतरं ||

 

( अर्थात : मै पहले दुर्जन लोगो को वंदन करता हूं और बादमे सज्जन लोगो को वंदन करता हूं. आप पूछेंगे के ऐसा उलटा क्यू ? तो ऐसा है के पहले दुर्जन को वंदन करनेसे वे खुश रहेंगे और सज्जन तो अच्छे लोग होते ही है और वे उनको बाद मे वंदन करनेसे मेरी शत्रुता नही करेंगे. ).

 

-----------------------------------  

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६४

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६४

------------------------------------------- 

 

निर्धनं निधनम् एतयो: द्वयो: तारतम्यविधिमुक्तचेतसाम |

बोधनाय विधिना विनिर्मिता रेफ: एव जयवैजयन्तिका  ||

 

( अर्थात : “निधन” का मतलब धनहीन अथवा मृत्यू. इन दोनो अर्थ के बीच का फरक याने कम जादा रहना ( याने तारतम्य ) समझने के लिये ब्रह्मदेव ने रेफ ( र्फ  ) का निर्माण किया है . जैसे की यह धनहीन के लिये जयपताका ही है . निर्धन लिखते समय यह पताका या रेफ देना पडता है और यह ही इसका निधन ( मृत्यू ) अर्थ से फरक बताता है. गरीबी से मृत्यू अच्छा यह अर्थ स्पष्ट करने की यह लिखने की तरकीब है. निर्धन से निधन अच्छा यह अर्थ “निधन” के ध उपर रेफ देने से निकलता है.).

 

---------------------------- 

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : 57

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ५७

 

सुबद्धस्य अपि भारस्य पूर्वबंध: श्लथायते |

 

( अर्थात : अर्जुन ने जब सुभद्रा से शादी की तब द्रौपदी अर्जुन को सवाल करते हुये कहती है : अच्छी पक्की बांधी हुई गठडी को दूसरी रस्सी से और बांधोगे तो पहली रस्सी ढिली पडही जाती है . आपने यह दुसरी शादी करने के बाद मेरे उपर का आप का प्रेम कम ही हुआ है. ).

------------------------------

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६३

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ६३

----------------------------------------------- 

 

आकर्ण्याम्रफलस्तुतिं जलम् अभूत् तत् नारिकेलांतरम्

प्राय: कंटकितम् तथैव पनसं, जातं द्विधा उर्वारुकम्  |

आस्ते अधोमुखम् एव कादलम् अलं द्राक्षाफलं क्षुद्रता

श्यामत्वम् बत जाम्बवं गतं अहो मास्तर्यदोषाद् इह  ||

 

( अर्थात : अपने फल ऐसे क्यो है इसकी कल्पना यहा की गयी है. शायद आम की तारीफ करने से बाकी फल असंतुष्ट हो गये होंगे ऐसी यहा कल्पना की गयी है. आम की तारीफ सुन के नारीयल का पानी पानी हो गया, फणस को रोमांच/कांटा  खडे हुये, वाळक ( एक प्रकार की ककडी ) के दुःख से दो तुकडे हो गये, केले ने अपनी गर्दन शरम से नीचे की, अंगूर सुकड कर छोटे हो गये और जाम्बून मत्सर से काले पद गये. ).

-------------------------------       

सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

विनोदाचे भागध्येय : धक्का

विनोदाचे भागध्येय : धक्का

--------------------------

ज्या विनोदावर आपण फिदी फिदी हसलो होतो, तोच जर पुन्हा ऐकला तर हसू तर येत नाहीच , पण कीव येते ! हमखास खसखस पिकवण्याचे सामर्थ्य असलेला विनोद हा प्रकार अशा शापाला वाहिलेला आहे. तो कायम नवा कोराच असावा लागतो !

विनोद हा प्रकार अपेक्षांचे प्रचंड भार वाहणारा असतो. एकदा आचार्य अत्रे ह्यांना आम्ही औरंगाबादला आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला बोलावले होते व त्यांच्या भाषणाचा विषय होता : विनोद. त्यात ते सांगत होते की विनोदात नेहमी अपेक्षांना धक्का द्यावा लागतो, तरच तो हसू आणतो. त्यावर त्यांनी एक उदाहरणा दाखल विनोद सांगितला . तो असा : एकदा ते एका कार्यक्रमासाठी कुठे बाहेरगावी गेले होते. कार्यक्रम आटोपता आटोपता रात्र झाली व कसेबसे स्टेशनावर आले तेव्हा गाडी सुटतच होती. समोर आलेल्या डब्यात ते चढले. डबा रिकामाच होता. सकाळी ते दरवाज्यात उभे राहून स्टेशन पाहू लागले तो आजूबाजूचे लोक हसत होते. त्यांना वाटले आपण किती लोकप्रिय ! आपल्याला लोक दाद देत आहेत. असे दोन तीन स्टेशनावर झाले व  स्वारी खूष झाली. गाडीतून उतरताना त्यांनी सहज डब्याकडे पाहिले तर तो स्त्रियांचा राखीव डबा होता ! अत्रे म्हणतात की हाच विनोद सांगतांना मी आधीच सांगितले असते की मी चुकून स्त्रियांच्या डब्यात बसलो होतो, तर काहीच हसू आले नसते. तर विनोदासाठी अपेक्षांना धक्का द्यावा लागतो.

विनोद पेरण्यासाठी कायम असे धक्के द्यावे लागतात ! एकदा वाचकाला एक धक्का बसला की तो पुढच्या वेळेस सतर्क राहतो व त्याला हसवायचे असेल तर मग वेगळा धक्का द्यावा लागतो. कायम नवीन धक्क्याचे भागध्येय ल्यालेला विनोद हा एकमेव प्रकार आहे !

----------------------

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

येऊ नयेचे निमंत्रण

एका निमंत्रण पत्रिकेत असे होते :
आपली उपस्थिती हाच आहेर आहे.
कृपया आहेर आणू नये.

( मद्दडां साठी अर्थ : येऊ नका!  )😀😁😂😇😬😯😆😅😄😢

सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : 51

भालेराव के सुसंस्कृत जोक्स : ५१  

 

क्षणे तुष्ट:, क्षणे रुष्ट:, तुष्टो रुष्ट: क्षणे क्षणे  |

अव्यवस्थितचित्तानां प्रसादोSपि भयंकर:  ||

 

( अर्थात : जिसका मन स्थिर नही, ऐसे आदमी का प्रसाद भी भयंकर होता है. ऐसा आदमी क्षण मे प्रसन्न तो क्षण मे गुस्से मे, ऐसा हर पल प्रसन्न अथवा क्रोधित रहता है. अभी प्रसन्न है समझ कर आप उससे बर्ताव करोगे तो अगले पल मे क्रोधित हो के क्या करेगा उसका भरोसा नही. ).

--------------------------------------------

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

पूल-ब्रिज-सेतु

पूल-ब्रिज-सेतु

-------------------- 

पुलाखालून बरेच पाणी वाहून जाते, पण इथे पूलच वाहून गेला आहे. पूलही कसा, तर शंभरी भरलेला. पुलांचे असे वाहून जाणे काय दाखवते ? पाण्याची मातब्बरी की पुलाची ? का आपल्या अज्ञानाची वाहती गंगा ? वैयक्तिक पातळीवर आपल्याला पुलाचे काय कळते ?

आम्ही १९६१ साली इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो तेव्हा सालाबादाप्रमाणे आम्ही शेजारच्याच संगमच्या रेल्वे पुलाची “फॅक्टर ऑफ सेफ्टी” काढायला गेलो होतो. आमच्या मोजमापाने ती चार भरत होती व प्रत्यक्षात म्हणे सहा होती. म्हणजे सहा पटीने जास्त भार आले तरी त्या पुलाला काही ढिम्म होणारे नव्हते.

महाडच्या पुलाशेजारी एक नवीन पूल झालाय, त्याच्याने पाण्याचा मारा जुन्या पुलाच्या पायथ्यावर होवू लागला व त्याने त्याच्या कमानी खाली आल्या. शिवाय वाळू उपसल्याने पुलाच्या भक्कम पायालाच खिंडार पडले होते.

असे पूल वाहून गेल्यावरच आपल्याला का कळते ? कारण एरव्हीचे आपले कळणे अगदी वरवरचे असते. जशी  पुलावरून जाणारी वाहने ! त्यांना स्वतःचे वजन माहीत नसते, पुलाची ताकद माहीत नसते, ताकद कमी झालीय का तेही माहीत नसते. कळते ते पूल वाहून गेल्यावरच ! असल्या कळण्याने  काय कप्पाळ कळते ?

बरे ही अज्ञानाची गटार-गंगा फक्त आपल्याकडेच वाहते आहे असे नाही तर सॅन फ्रान्सिस्को इथला प्रसिद्ध बे ब्रिजही वादाच्या भोवऱ्यात आहे. कारण कुठला तरी एक पार्ट रिजेक्ट झाला आहे म्हणे व त्याने त्या ब्रिजला धोका आहे.

आपले ज्ञानाचे सेतु केव्हा बळकट होणार ?

------------------

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

आमंत्रण निमंत्रण

--------------------------------------
आमंत्रण, निमंत्रण
------------------------
आमंत्रण व निमंत्रण हे दोन्ही सकारात्मक शब्द असून त्यात एक चांगले वा वाईट असे काही नाही. दोन्हीचा अर्थ बोलावणे, अवतणे असाच होतो. दोन्ही कडे पायाभूत शब्द आहे मंत्र ज्याचा अर्थ प्रार्थना, स्तोत्र असा आहे. आ हा उपसर्ग लावून पर्यंत, पासून ह्या अर्थाचे शब्द आपण अनेक करीत असतो, जसे : आजन्म ( जन्मापासून), आमरण ( मरणापर्यंत ), आक्रमण , आकर्ण, आक्रोश वगैरे. तसेच नि हा उपसर्ग लावून आपन अनेक शब्द करतो ज्याचा अर्थ ह्याने युक्त, वा लुप्त असा होतो. जसे: निनाद, निपुण,  नि ह्या उपसर्गामुळे नकारात्मकता येते असे आपल्याला वाटते खरे पण नि पासून सुरू होणारे अनेक शब्द असे आहेत की जे सकारात्मक अर्थाचेच आहेत, जसे : निकट, निकष, निकुंज, निकेतन, निखालस, निखिल, निगडित, निगमन, निगराणी, निग्रह, निजणे, निर्णय, नित, नितळ, नितान्त, निदान, निनाद, निपुण, निभणे, निमंत्रण वगैरे. त्यामुळे मंत्र व मंत्र म्हणणे म्हणजे मंत्रण करण्यापर्यंतचे बोलावणे किंवा मंत्रण करण्याने युक्त असे बोलावणे असाच दोन्ही ( आमंत्रण, निमंत्रण ) शब्दांचा अर्थ होतो व दोन्ही अर्थ सम-बलाचे आहेत. असेच समान अर्थाचे शब्द आहेत : आयोजन-नियोजन , आयोग-नियोग.
  संस्कृत व्याकरणात हे दोन शब्द जरा भिन्न अर्थांनी वापरलेले दिसतात.  "गच्छेत्" सारख्या रूपांचा अर्थ सांगताना पाणिनीने विधि-निमन्त्रण-आमन्त्रण-अधीष्ट-सम्प्रश्न-प्रार्थन (पा.सू. ३।३।१६१) इतके वेगवेगळे अर्थ दिले आहेत. त्या सगळ्यांची चर्चा मला करायची नाही, पण निमन्त्रण आणि आमन्त्रण हे दोन वेगळे अर्थ दिले आहेत.  त्यातला फरक काशिकावृत्तीमध्ये "निमन्त्रणम् नियोगकरणम्, आमन्त्रणम् कामचारकरणम्" असा दिला आहे.  म्हणजे निमन्त्रण शब्दाचा "हे केलेच पाहिजे" (अवश्यकर्तव्ये प्रवर्तना, यत्र अकरणे प्रत्यवाय:) असा नियोग म्हणजे आज्ञा असा अर्थ आहे, तर आमन्त्रण म्हणजे तुमच्या इच्छेने हे करायचे असले तर करावे, केले नाही तर काही हरकत नाही (यत्र अननुष्ठानेऽपि न प्रत्यवायस्तत्र प्रवर्तना).  संस्कृतवाङ्मयात हा काटेकोर फरक सगळीकडे दिसत नाही.  महाभारतात दमयन्तीचा बाप भीमराजा तिच्या स्वयंवराचे निमन्त्रण सर्व राजांना पाठवितो - स संनिमन्त्रयामास महीपालान्.  अर्थात् ही आज्ञा नाही, पण आग्रहाचे बोलावणे आहे. 
निमंत्रण ही आज्ञा/कर्तव्य असल्याने ज्यांनी खरेच समारंभाला यावे असे वाटत असेल त्यांना निमंत्रण द्यावे, तर आलात, जमले तर या असे ज्यांना म्हणायचेय त्यांना आमंत्रण द्यावे !
----------------------------------------------------

मित्र

-------------------------
मित्र
-----------
मला अजिबात मित्र नाहीत. त्याचे खापर मी माझ्या शब्दकोशावर फोडीन म्हणतो. कारण माझ्या शब्दकोशात आधी जो शब्द येतो तो आहे मित म्हणजे मोजका. आणि त्यानंतर येतो मित्र. त्यामुळे मोजकाच असलेला तो मित्र असा मी अर्थ काढला असावा.
आणि झालेही असेच. इंजिनियरिंगला पुण्याला हॉस्टेलला असताना आमच्याच मजल्यावर एक पारशी मुलगा होता. खरे तर तो इतका देखणा, गोरा, स्मार्ट आणि परत हुशार, असल्याने माझा मित्र होईल असे जाम वाटले नव्हते. पण तो होता बिजापूरचा व त्यामुळे त्याला मराठी चांगले येई. त्यामुळे आमची मैत्री झाली होती.
मैत्री म्हणजे किती दाट ! त्याकाळी जवळ जवळ दिवसातले २० तास तरी आम्ही बरोबर असू. त्याच्या नादाने मी नॉन-व्हेज खायला शिकलो, सिनेमे पाह्यले व त्याकाळात कॅंपातल्या ऑंट्याकडे जाऊन देशी ठर्राही प्यालो. सहा रुपये तासाने तो स्कूटर घेऊन यायचा व आम्ही अशा चकरा मारायचो. नंतर तो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्यावर होता. तो होताच इतका हुशार की त्याच्याबद्दल मत्सर वाटायच्या आधी त्याच्या हुशारीचा अभिमानच वाटायचा. मग मी मुंबईला आलो व तो कुठे कुठे गेला, काय माहीत नाही. आम्ही चाळीस वर्षे भेटलो नाही. तरीही मला वाटे माझा मोजका मित्र तो हाच.
मग एकदा मी होस्पेटला नोकरीनिमित्त असताना बिजापूरहून जाताना त्याचा शोध घेतला. त्याला भेटलो, त्याचे घर पाहिले. आणि मला त्याला भेटल्याचे अपार वाईट वाटले. ज्याच्या बद्दल एवढ्या मोठ्या मोठ्या कल्पना मी बाळगल्या तो एका गल्लीत एका साधारणशा घरात राहात होता. मला ह्या नियतीचे फार वाईट वाटले. माझा भ्रमनिरास झाला.
ह्यालाही आता पंधरा वर्षे होत आली. त्यानंतरही आम्ही कधी परत भेटलो नाही.
आता माझे फेसबुकवर भले ६०० मित्र आहेत पण मित्र-दिवसानिमित्त कोण बरे माझा मित्र असा विचार केला तर फक्त त्याचेच चित्र सामोरे येते.
मित नंतर मित्र, हा क्रम लावणार्‍या शब्दकोशाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, ह्या मित्र-दिवसाच्या दिवशी !
-----------------------------------------